Breaking

जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पिंपरवाडी बनतेय कोरोनाचे हॉटस्पॉट


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील करोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे, जुन्नरच्या आदिवासी भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे. जुन्नर पासून ४० किलोमीटर अंतरावर असणारे पिंपरवाडी गाव करोनाचे हॉटस्पॉट बनले आहे.


आज आंबे पिंपरीवाडी मध्ये ३० व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यामध्ये ७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्या सर्वांवर लेण्याद्री येथील करोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. अवघ्या १५० लोकसंख्या असलेल्या गावात मागील आठ दिवसात १२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


दरम्यान, आंबे पिंपरवाडी गावात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली, तसेच आज पिंपरवाडीमध्ये ६० व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा