Breaking

पिंपरी चिंचवड : वंचित आणि उपेक्षित वर्गाची काळजी घेऊ - सभागृह नेते नामदेव ढाकेपिंंपरी चिंचवड : कोविडची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक दुर्बल घटकातील कुंटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडुन तातडीची मदत म्हणून तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. 


शहरातील रिक्षाचालक (बॅचधारक), परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर इ. आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणाऱ्यांना मदत दिली जाणार आहे, असे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील सत्तारूढ सभागृह नेते नामदेव ढाके यांनी सांगितले.


कोविड संसर्ग टाळण्यासाठी शासनाने राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे या आर्थिक दुर्बल घटकातील हातावर पोट असलेल्या लोकांवर आर्थिक संकट ओढवुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.


यावर आवाज उठवुन राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेवुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही रुग्णवाढ रोखण्यासाठी कडक निर्बंध, लॉकडाऊन करणे आवश्यक वाटत आहे. पण, घाईघाईने याबाबत निर्णय घेतल्यास त्याचा फटका समाजातील अनेक घटकांना बसणार आहे. यामुळे प्रथम लॉकडाऊनचा फटका ज्यांना ज्यांना बसू शकतो, त्या सर्वांना पॅकेज देणे आवश्यक आहे, अशी मागणी केली होती. परंतु अशा सामान्य घटकांचा विचार न करता तोंडाला पाने पुसणारे तुटपुंजे पॅकेज जाहीर करुन राज्यशासनाने लॉकडाऊन करण्याचा अट्टहास केला. यामुळे गोरगरीब, कामगार, मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी टिकाही नामदेव ढाके यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा