Breaking
पिंपरी चिंचवड : कोरोनावर प्रभावी असलेल्या रेमिडी सिव्हर इंजेक्शन जनतेला उपलब्ध करुन द्या - मनसेपिंपरी चिंचवड कोरोनावर प्रभावी असलेल्या रेमिडी सिव्हर इंजेक्शन  जनतेला उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 


निवेदनात. म्हटले आहे की, कोरोना आजार आपल्या शहरात व देशात खुप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आशा वेळेला शहरातील सर्व घटकांनी एकमेकांना साथ देऊन या आजारावर मात केली पाहिजे. शहरातील सर्व यंत्रणा या महामारीत एकमेकांना सहकार्य करीत असताना शहरातील सर्व मेडिकल व दवाखान्यात कोरोना वर प्रभावी ठरणारे रेमिडी सिव्हर इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. तसेच मोठ्या प्रमाणात काळा बाजार चालू आहे. इंजेक्शनच्या मुळ किंमती पेक्षा शहरात इंजेक्शन चढ्या भावात विकले जात आहे. या महामारीच्या परिस्थितीत काही महाभाग नागरिकांच्या अडचणीचा गैर फायदा घेऊन नागरिकांनची लुट करत आहे. तरी शहरात वरील इंजेक्शन पुरवणाऱ्या कंपनीकडून आपण आपत्कालीन स्थिती लक्षात घेता आपल्या अधिकारात महापालिकेच्या वतीने रेमिडी सिव्हर इंजेक्शनची खरेदी करून शहरातील सर्व नागरिकांना उपलब्ध करुन द्यावीत.

शहरातील कोणकोणत्या डिलर्सला किती इंजेक्शन पुरवठा केला जातो. याची माहिती व डिलर्स कडून रोज कोणकोणत्या मेडिकल व दवाखान्यात इंजेक्शन चा किती पुरवठा केला जातो याची चौकशी करावी. डिलर्स, मेडिकल, दवाखाना व कोविड सेंटर कडून रोज इंजेक्शन चा पुरवठा (कोठा) सर्व नागरिकांसाठी जाहीर करावा व महापालिकेच्या वतीने या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. या प्रकरणात जे दोषी सापडेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी शहर अध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले, शहर सचिव रुपेश पटेकर, अध्यक्ष पिंपरी चिंचवड हेमंत डांगे, उपाध्यक्ष बाळा दानवले, विशाल मानकरी, महिला सेनेच्या सचिव सिमाताई बेलापुरकर, वाहतूक सेनेच्या अध्यक्ष सुशांत साळवी हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा