Breaking


पिंपरी चिंचवड : वसुली एजंटांनी घरी शांत बसावे - क्रांतिकुमार कडुलकर


पिंपरी चिंचवड : खाजगी वित्तसंस्था आणि बँकांंच्या वसुली एजंटांनी कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये कर्ज वसुली थांबवली नाही तर वसुली एजंटना परिणामकारक भाषेमध्ये वसुली का थांबवावी हे समजून देऊ, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शहर समितीच्या वतीने क्रांतिकुमार कडुलकर यांनी दिला आहे.


कडुलकर म्हणाले की, कर्जदार हे काही शहर सोडून परदेशात पळून जाणार नाही. खाजगी वित्तसंस्था आणि खाजगी बँकांच्या वसुली एजंट आणि अधिकाऱ्यांना सूचनावजा इशारा देत आहे.
 
पिंपरी चिंचवड शहरात विविध खाजगी वित्तसंस्थाच्या वसुली एजंटांनी रिक्षाचालक, छोटे व्यावसायिक तसेच कामगारांच्या व्यक्तिगत कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावलेला आहे. रिक्षा, टेम्पो, दुचाकी ओढून ताब्यात घेतली जात आहेत.
 
2020 पासून कोरोना मुळे शहरातील हजारो नागरिक आर्थिक विवंचनेत आहेत. कर्जदार कोणतेही कर्ज बुडवण्याच्या मनस्थितीत नाहीत, मात्र ते लगेच कर्जाचे थकीत हप्ते भरण्याच्या क्षमतेचे राहिलेले नाहीत. 2020 मधील लॉकडाऊन मूळे पिंपरी चिंचवड शहरातील सामान्य जनतेची आर्थिक स्थिती सुधारेल यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कोणतेही आर्थिक पॅकेज दिलेले नाही, असेही ते म्हणाले.
 
कोरोनाची ही दुसरी लाट अतिशय विदारक आहे. शहरातील 10 लाखाहून जास्त नागरिक दोन वेळचे जेवण कसे मिळेल याच्या विवंचनेत आहेत. मात्र खाजगी वित्तसंस्था आणि बँका यांचे वसुली एजंट  वारंवार फोन करून, मानसिक त्रास देत कर्ज वसुली करणार असतील तर तणाव निर्माण होतील. त्यामुळे कोणीही कर्जे फेडणार नाही. सध्या तरी वसुली एजंटांनी घरी शांत बसावे, असे कडुलकर यांनी म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा