Breaking

पिंपरी चिंचवड नगरसेवकांच्या संघर्षाला यश, ४० लाख लिटरच्या टाक्या बसवल्या, पाणी टंचाई दूर होणार !चिखली : जाधववाडी, कुदळवाडी, राजे शिवाजीनगर येथील पाणी पुरवठ्याची समस्या अतिशय तीव्र आहे. प्रभागात 2012 पासून नव्या सोसायट्या आणि नागरी वस्ती वाढत आहे, या प्रभागाची लोकसंख्या 80 हजारच्या आसपास आहे.


भोसरी विधानसभा मतदार संघातील या मोठ्या प्रभागात आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव आणि नगरसेविका अश्विनी जाधव यांनी प्रभागातील पाणी टंचाई पूर्णतः संपवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अथक प्रयत्न केले. आता पाणी टंचाई दूर होणार आहे.

माजी महापौर राहुल जाधव यांनी सांगितले की, कृष्णानगर येथून येणारे पाणी सेक्टर 16 येथील जुन्या पंप हाऊसमधून ग्राव्हीटी मार्फत वितरीत केले जात  होते. त्यामुळे कमी दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. 2012 साली प्रथम निवडून आलो. सर्वांचे सहकार्य घेतले आणि पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने निवडून दिले आहे याची जाणीव आमदार महेश लांडगे यांनी सतत करून दिली. 2018 साली वर्क ऑर्डर मिळाल्यावर आम्ही हे काम पूर्ण करून घेतले आहे. पाण्याचे नियमानुसार टेस्टिंग झाल्यावर उच्च दाबाने प्रभागात पाणी पुरवठा येत्या आठ दिवसात होईल.


विद्यमान नगरसेविका अश्विनी जाधव यांनी सांगितले की, पाण्याची ही टंचाई कायम स्वरूपी संपवण्यासाठी 40 लक्ष लिटरच्या दोन टाक्या प्रभागातील रामायण मैदान येथे बांधाव्यात, असा प्रस्ताव आम्ही  प्रशासनाला दिला होता. प्रभागाची भौगोलिक रचना, एकूण लोकसंख्येचा अभ्यास करून पाणी टंचाई कायम स्वरूपी संपवण्यासाठी आम्हाला प्रशासकीय लढाई दयावी लागली, सतत निवेदने देऊन आणि सभागृहामध्ये आम्ही पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आणला.

2007 पासून येथील नागरिक पाण्यासाठी वंचित

2007 पासून या भागातील नागरिक पाण्यासाठी वंचित होते. लवकरच या नव्या टाक्यामधून उच्च दाबाने प्रभागात पाणी पुरवठा होणार आहे. एकूण लोकसंख्या आणि पाण्याची उच्च दाबाची गरज लक्षात घेऊन 40 लक्ष लिटरच्या टाक्यांमध्ये येईल. तेथून कृष्णानगर येथील मुख्य जलवितरण वाहिन्यातून प्रमाणित दाबाने येणारे पाणी रामायण मैदान येथील नव्या टाक्यामार्फत प्रभागातील बहुमजली सोसायट्या, जाधववाडी, पंतनगर, रिव्हर रेसिडेन्सी, मधला पेठा, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी या परिसरात पुरेसे पाणी वितरित केले जाईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा