Breaking

कविता : आठवण प्रेमाची - प्रताप शेजवळ


आठवण तुझी जेव्हा जेव्हा येते

तेव्हा माझे डोळे भरुन येते

अन मन माझे तुझ्या 
आठवणीच्या सागरात वाहून जाते

तु गेलीस तेव्हापासुन 
काळजाची धडधड बंद झालीय
तरीपण तुझ्या आठवणीच्या
श्वासाबरोबर जगायची सवय केलीय

जसं प्रेमामध्ये असल्यावर
एकमेकांना भावनेची तहान लागते..
तसचं आता दुरावल्यानंतर
प्रेमाची तहान अश्रुंनी भागते

तुला गमावल्याच्या नंतर असंं वाटत आहे की
काहीतरी मी स्वता:च हरवलयं

ह्रदयातील प्रेमळ भावना 
कुणाजवळच व्यक्त नाही करायच्या आता 
मी ठरवलयं

तुझ्याविना जगणं आता
झालय अवघड मला
वाटे जणु पाण्याविणा तडफडे मासा
 
तुझ्यात मी स्वत:ला विसरुन गेलोय
मनास विचारतो आहे 
अगोदर होतो तरी मी कसा..

💕✍🏻 प्रताप शेजवळ


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा