Breaking

पुणे : राज्यातील लोक कलावंतांवर मोठं संकट, मदतीची गरज !


नारायणगाव (जुन्नर) : राज्यातील तमाशा कलावंत, बहुरूपी, भारुडी, पिंगळे, डोंबारी, पोतराज, वैदू, वासुदेव, डोंबारी, साहित्यिक, कलाकार, बँड कलाकार तसेच भटक्या समाजाचे जीवन कोरोनामुळे उध्वस्त झाले आहे. हे लोक सर्वात जास्त जनतेच्या संपर्कात असतात, त्याशिवाय त्यांच्या चुली पेटत नाहीत. 


कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षीही लोक कलावंतांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थिती लोक कलावंतांना समाजातून मदतीची गरज आहे. 

तालुक्यातील नारायणगाव हे तमाशा कलावंतांचे केंद्र आहे. दरवर्षी या ठिकाणाहून  यात्रा - जत्रांसाठी जनतेचे मनोरंजन करण्यासाठी लोक कलावंत जात असतात. प्रसिध्द तमाशा लोककलावंत मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर यांच्यासह असंख्य कलावंतांच्या राहुट्या असतात. परंतु कोरोना महामारीमुळे लोक कलावंतांवर मोठे संकट उभे राहिले आहे. गावोगावच्या यात्रा बंद असल्याने तमाशा फड मालकांना उत्पन्न नाहीये. 

गेल्या वर्षीही तमाशा कलावंतांना काही प्रमाणात राज्य सरकारच्या वतीने दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. परंतु यंदाही ऐन यात्रा उत्सवांच्या काळातच लॉकडाऊन करण्यात आल्याने पुन्हा एकदा मोठं संकट या कलावंतांपुढे उभे राहिले. 

बहुरूपी, भारुडी, पिंगळे, डोंबारी, पोतराज, वैदू, वासुदेव, डोंबारी, साहित्यिक, कलाकार, बँड कलाकार हे अजूनही शासनाच्या दप्तरी. तरी दखलपात्र नाही. हे सुध्दा आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.


वल्लभ बेनके यांच्याकडून "तमाशा" कलावंतांना मदत

तमाशा लोक कलावंतांसमोरील काळात माजी आमदार वल्लभ यांच्या वतीने आमदार अतुल बेनके यांनी राज्यातील "तमाशा" कलावंतांसाठी ५ लाख रुपये मदत सुफूर्त केली.

यावेळी आमदार अतुल बेनके, तमाशा परिषदेचे अध्यक्ष कलाभूषण रघुवीर खेडकर, उपाध्यक्ष अविष्कार मुळे, कार्याध्यक्ष संभाजीराजे जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जुन्नर तालुका अध्यक्ष सुरजभाऊ वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा