Breaking
पुणे : उद्योगांनी कोरोना संक्रमित कामगारांच्या वेतनात कपात करू नये - माकप


पुणे : पिंपरी चिंचवड, पुणे औद्योगिक क्षेत्रात असंघटित कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे त्यांना सलग 10 ते 14 दिवस कामावर हजर होता येत नाही. बहुसंख्य कामगार कंत्राटी तरुण मुले, मुली आणि महिला आहेत. 2020 मध्ये अशा अनेक कामगारांचे आस्थापनानी आणि ठेकेदारांनी वेतन कपात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने निवाडे दिले आहेत की कोरोना ग्रस्त कामगारांचे उपचार आणि वेतन ही कायद्याच्या भाषेत आस्थापना आणि संबंधित ठेकेदारांची जबाबदारी आहे. या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत उद्योगांनी कोरोना संक्रमित कामगारांच्या वेतनात कपात करू नये, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर सचिल कॉम्रेड गणेश दराडे यांनी केली आहे.


प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, प्रोडक्शन लाईन, क्वालिटी, स्टोअर्स, मालवाहतूक या ठिकाणी काम करताना संसर्ग जास्त होत आहे. त्यामुळे चाकण, पिंपरी चिंचवड, तळेगाव, रांजणगाव येथील असंघटित कामगारांना ई. एस. आय ची सेवा असली तरी औद्योगिक परिक्षेत्रात ई. एस. आय. चे कोरोना समर्पित कोणतेही हॉस्पिटल नाही.


संसर्ग झालेल्या किंवा होऊ शकणाऱ्या कामगाराची आरोग्य विषयक काळजी तसेच त्यांचे वेतन कपात केली जाणार नाही, याची दक्षता संबधित आस्थापना आणि ठेकेदार घेतील. या संबंधी काही तक्रारी आल्यास त्याचे निराकारण करण्यात येईल, असे माकपच्या पत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा