Breaking

राजूर : कोव्हीड केअर सेंटरला नागरिकांकडून मदतीचा ओघ !


राजूर (अकोले) : येथील कोरोना काळजी केंद्रास स्थानिक नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आज डॉ. टी. के. लांडे यांनी चाळीस हजार रुपयांचे औषधे देऊन रुग्णांची काळजी घेतली आहे. 


तर यापूर्वी राजेंद्र पवार, शांताराम पवार यांनी दीड लाख रुपयांचे औषधे देऊन या काळजी केंद्रास मदत केली. राजूर गावातील अनेक व्यापारी त्यात सुरेश कानकाटे, राम चोथवे, मोघाजी भांगरे यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली. तर राजूर येथील रहिवासी मात्र शहापूर येथे गटविकास अधिकारी पदावर कार्यरत असलेले विनायक भवारी यांनी तीस हजार रुपयाचे अंडे केंद्रास दिले.

राजूर येथे सध्यस्थितीला ७० रुग्ण असून त्यांची डॉ.दिघे, डॉ.शेळके, नर्स चांगली काळजी घेत आहेत. तर राजूर ग्रामपंचायत कर्मचारी देखभाल स्वच्छता करून या रुग्णांना बरे होण्यासाठी मदत करत आहे.

माजी मंत्री मधुकर पिचड, भाजपचे वैभव पिचड, सरपंच गणपत देशमुख, बाळासाहेब देशमुख, गोकुळ कानकाटे, भास्कर एलमामे, पोलिस अधिकारी नरेंद्र साबळे, नितीन खैरनार, श्रीराम पन्हाळे, राजेंद्र चोथवे, दत्ता निगळे, ग्रामसेवक नाडेकर हे मदत करत आहे.

कोरोना रुग्ण वाढू नये. म्हणून राजूर लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर विनाकारण बाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांवर दंड आकारण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच गणपत देशमुख यांनी दिली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा