Breaking
बलात्कार प्रकरण : संशयित रिक्षाचालकास अटक करून कठोर शिक्षा करा - सुशिल कुमार पावरा


हेमडी येथील आदिवासी कातकरी महिलेचा बलात्कार प्रकरण 


रत्नागिरी : हेमडी येथील आदिवासी कातकरी महिलेचा बलात्कार करून हत्या करणाऱ्या संशयित  रिक्षाचालकास तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करा, अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग प्रमुख सुशिल कुमार पावरा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कडे केली आहे 


निवेदनात असे म्हटले की,  हेमडी येथील विटभट्टी कामगार आदिवासी कातकरी महिलेचा दिनांक 31 मार्च 2021 रोजी भरदिवसा बलात्कार करून खून करण्यात आला आहे. सदर घटना अत्यंत निंदनीय असून माणूसकीला काळीमा फासणारी आहे.या  घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. घरी लग्न असल्यामुळे सदर महिला वय 42  ही आपल्या नवर्याला माजगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील विटभट्टी वरून आणण्यासाठी सकाळी 10 वाजता च्या दरम्यान रिक्षा भाड्याने घेऊन निघाली होती. दुपारी 2 च्या दरम्यान सदर रिक्षावाला विटभट्टी वर तिच्या नवर्याकडे गेला व तुला तुझी बायको न्यायला आली आहे पण तुला मालक सुट्टी देणार नाही म्हणून इथं न येता ती पुलाखाली थांबली आहे तर तू पटकन आवरून चल,असे म्हणाला. नवरा जेव्हा 100 मीटर अंतरावर पुलाजवळ पोहचला तेव्हा त्याची बायको झुडुपात  मृतावस्थेत पडलेली आढळली. नवर्याने तिच्या बायकोला दवाखान्यात नेऊयात असे म्हटले .माञ मला दुसरे काम आहे म्हणत रिक्षाचालक तेथून  पसार झाला. त्यानंतर विटभट्टी मालकाच्या गाडीतून दवाखान्यात नेण्यात आले. डाक्टरानी तिला मृत घोषित केले. 


पिडीतेचा मृत्यू झाल्यानंतर 24 तासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आदिवासी कधी जन्माला , कसा जन्मला व  कसा मरतो याकडे प्रशासनही जाणीवपूर्वक  दूर्लक्ष करते. हे या घटनेवरून दिसते.कारण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून घेण्यासाठी 18 तास तक्रारदारास वाट पाहत  थांबावे लागते. पोलीस ठाण्यात आदिवासी बांधवांना नीट वागणूक दिली जात नाही. ही एक गंभीर बाब आहे. 

 

बलात्कार व हत्या सारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा व गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित  पोलीस अधिकार्यांस सेवेतून बडतर्फ करावे,असा कायमचाच नियम  करावा. जेणेकरून बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधामांना कठोर शिक्षा होण्यास मदत होईल व गुन्हे नोंद न करणारे, गैरकारभार करणारे पोलीस अधिकारी कायमचेच घरी राहतील व सामान्य आदिवासी जनतेला न्याय मिळण्यास मदत होईल. म्हणून आदिवासी कातकरी महिलेचा बलात्कार करून हत्या करणाऱ्या संशयित रिक्षाचालकास तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा सुशिलकुमार पावरा यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा