Breaking
रोहिदास जाधव यांनी अर्थशास्त्र विषयातून सेट परीक्षेत मिळवले यश !


बीड : रोहिदास जाधव हे अर्थशास्त्र या विषयात राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


२७ डिसेंबर २०२० रोजी सेट परीक्षा झाली होती. तिचा निकाल ७ एप्रिल रोजी जाहीर झाला. सहाय्यक प्राध्यापक पात्रतेसाठी ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करते. रोहिदास जाधव यांनी अर्थशास्त्र या विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रोहिदास जाधव हे माजलगाव तालुक्यातील जामगा तांडा, तालखेड येथील असून त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण अर्थशास्त्र या विषयात बलभीम महाविद्यालयातून केलेले आहे. रोहिदास जाधव हे शालेय जीवनापासूनच विद्यार्थी चळवळीत सक्रिय आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी जिल्हा आणि राज्यस्तरावर अनेक आंदोलनांचे नेतृत्व केलेले आहे. ते डिसेंबर २०१८ पासून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे राज्य सरचिटणीस आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.

विद्यार्थी चळवळीत कायम सक्रिय राहून अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष देऊन सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल रोहिदास जाधव यांचे जिल्हा आणि राज्यभरातून कौतुक होत आहे. सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस त्यांना अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा