Breaking

सांगोला : कोव्हिड रुग्णालय सुरु करण्याची शेतकरी कामगार पक्षाची पालकमंत्र्यांंकडे मागणी


सांगोला
(सोलापूर) : सध्या राज्यासहित जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. तसाच प्रसार सांगोला शहरासह ग्रामीण भागात सुध्दा वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर शेकापक्षाने भाई गणपत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व महानंदाचे संचालक चंद्रकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केल्या.


त्यामध्ये सध्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या व येणाऱ्या काळातील संभाव्य रुग्ण संख्या ह्याचा विचार करुन सांगोलेमध्ये कोव्हिड रुग्णांसाठी १०० खाटाचे रुग्णालय सुरु करण्याची प्रामुख्याने मागणी करण्यात आली.


तसेच रुग्णासाठी अत्यावश्यक असणारा आँक्सिजन सहजपणे मिळत नसून रुग्णांचे नातेवाईकांची आँक्सिजन मिळवण्यासाठीची जी ससेहोलपट होतीय ती दुर्भाग्यपुर्ण आहे, अशी खंतही व्यक्त केली आहे. पळापळ करुनही रुग्णांना आँक्सिजन मीळत नाही. त्यामुळे रुग्णाच्या जिवीताला धोका निर्माण होतो आहे. तो धोका कमी करण्यासाठी रुग्णासांठी आँक्सिजन ताबडतोब मिळावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


तालुक्यातील रुग्णसंख्या व येणाऱ्या काळातील रुग्णांची संख्या ह्याचा विचार करुन सांगोलामध्ये १०० खाटाचे रुग्णालय सुरु करावे व आँक्सिजन व रेमडेसिवेर इंजेक्शनचा तुटवडा दुर करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाने पालकमंत्र्यांकडे निवेदन केली.


निवेदनावर महानंदा चे संचालक चंद्रकांत देशमुख, सांगोला पंचायत समितीच्या सभापती राणी कोळवले, जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, दिपक गोडसे, विशालदिप बाबर, चंद्रकांत सरतापे, अँड धनंजय मेटकरी, हनुमंत कोळवले यांच्या सह्या आहेत.

संकलन - अतुल फसाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा