Breaking
मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा समन्वयकपदी ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ यांची निवड


वडवणी : बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने काल दि.१ एप्रिल रोजी बीड जिल्ह्यातील काही नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये परिषदेच्या बीड जिल्हा समन्वयकपदी वडवणी येथील शासकीय अधिस्विकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ यांची निवड करण्यात आली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य असून पत्रकारांच्या अडीअडचणीत धावून येणारी संघटना म्हणून नावलौकिक आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांची मातृसंस्था म्हणून देखील मराठी पत्रकार परिषदेला ओळखले जाते. या संघटनेचा अधिकचा विस्तार पाहता पत्रकारांचे लढवय्ये नेते तथा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, सरचिटणीस संजीव जोशी, शरद पाबळे, राज्य प्रसिध्दीप्रमुख अनिल महाजन यांच्या मान्यतेने परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, कार्याध्यक्ष दत्तात्रय आंबेकर, सरचिटणीस विलास डोळसे, विभागीय सचिव विशाल साळुंखे यांच्या मुख्य उपस्थितीत बीड जिल्ह्यातील काही पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा समन्वयकपदी वडवणी येथील दैनिक झुंजार नेताचे ज्येष्ठ तालुका प्रतिनिधी तथा शासकीय अधिस्विकृतीधारक पत्रकार सुभाषराव दिगंबरराव वाव्हळ यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे वडवणीसह तालुकाभरातून व पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन होवून शुभेच्छा देण्यात येत आहेत. 

यावेळी निवडीनंतर बोलतांना सुभाषराव वाव्हळ म्हणाले की, प्रथमतः माझी परिषदेच्या बीड जिल्हा समन्वयकपदी निवड केल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व पदाधिकारी यांचा व मराठी पत्रकार परिषदेचा मी मनापासून आभारी आहे. परिषदेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना भेडसावणाऱ्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी व पत्रकारांच्या वृध्दी व उन्नतीसाठी मी नेहमी तत्पर राहील अशी ग्वाही यानिमित्त देतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा