Breaking

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन"... उच्च शिक्षणाला जागतिक आयाम देणारा महाराष्ट्रपुत्र गमावला!"


मुंबई : भारतातील उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण आणि आधुनिकतेचा प्रवाह आणणारा महान वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांचे निधन झाले आहे.


ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरूण निगवेकर बहूआयामी होते. विनयशील स्वभावाच्या डॉ.निगवेकर यांनी पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ, कुलगुरू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही शिक्षण क्षेत्रात विद्यार्थीभिमुख असे काम केले. भारतातील उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण प्रवाह आणण्यासाठी त्यांनी ‘नॅक’ सारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न केला. देशातील संगणक तंत्रज्ञान आणि नागरी सेवा क्षेत्रातील शिक्षणाच्या दर्जात्मक सुधारणेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. भारतातील उच्च शिक्षणाला जागतिक आयाम देणारा महाराष्ट्रपुत्र आपण डॉ. निगवेकर यांच्या निधनामुळे गमावला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा