Breaking

जुन्नर तालुक्यातील शंभुदेव डोंगराला अज्ञातांनी लावली आग


जुन्नर : तालुक्यातील डोंगरांना आग लावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. या अगोदर तालुक्यातील पश्चिम भागातील भिवाडे, कुकडेश्वर तसेच देवळे, खैरे, खटकाळे, तळमाची, निमगिरी येथील डोंगरांना आग लावण्यात आली होती. 


काल (ता. ६) अज्ञातांकडून कुकडेश्वर येथील शंभुदेव डोंगराला आग लावण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक रमेश खरमाळे, सचिन कवटे, वैभव वाजे आणि वनविभागाचे फायर कंट्रोल टीम आफटाळे तसेच ग्रामस्थ सुनिल मुकणे, गणेश सरोगदे, पंढरीनाथ सरोगदे, भिमा सरोगदे, संदीप पोपट सरोगदे यांच्या अथक परिश्रमातून आग आटोक्यात आली. अज्ञातांनी लावलेल्या या आगीमुळे परिसरात वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा