Breaking

धक्कादायक : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे जवळपास २२ रुग्णांचा मृत्यू तर अनेक गंभीर


नाशिक : राज्यात आणि देशभरात ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे. अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहे. मात्र नाशिक मधील महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २२ जणांचा ऑक्सिजन गळतीमुळे मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर असल्याची धक्कादायक माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.

 

नाशिक मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनवर १३१ रुग्ण आहेत. तर अत्यवस्थ रुग्ण 15 व्हेंटिलेटरवर आहेत. हा ऑक्सिजन टँक 13 KL क्षमतेचा होता. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता त्यानंतर रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या ऑक्सिजन गळतीमुळे जवळपास २२ रुग्ण दगावल्याने महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा