Breaking

विशेष लेख : माणसाचं स्वप्न - दिपाली मारोटकर


प्रत्येक माणसाला वाटते आपल्या जवळ काहीतरी असं असावं की जेनेकरून आपलं जीवन सुखी व्हावं, पण सुख दुःख या लागल्याच गोष्टी आहे. असं नाही की गरीबाला दुःख आणि श्रीमंताला सुख आहे. गरीबाला सुद्धा सुख दुःख आहे आणि श्रीमंताला पण आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात अनेक दुःखांना, अडचणींना, संकटांना समोर जाऊन सुखाचे दिवस आणत असतो. सर्वांचे विचार वेगवेगळे असतात. प्रत्येकाच्या मनात एक कला दडलेली असते. आणि फक्त ती कला बाहेर कशी येईल, या साठी काय करावं लागणार ही कल्पना नसते.


जीवनात पुढे जाण्यासाठी पैसा नाही तर, मोठ्यांचा आशीर्वाद पुरेसा असतो. परिस्थिती आपल्याला कसं जगावं हे शिकवून जाते. प्रत्येक दिवशी एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो. आणि त्या अनुभवातून आपण खूप काही शिकत राहतो.

जेव्हा माणूस अनूभव घेतो
चुकीच्या मार्गाने जाणे सोडतो,
मनात खूप करण्याची आस
ठेवून चांगल्यास हात जोडतो..!

एखाद्या गोष्टीवर कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर, त्या व्यक्तीवर रागवू नका. कदाचित त्यातून आपल्यालाच एक नवा मार्ग मिळतो. कधी कधी एखादी लहान व्यक्ती खूप काही सांगून जाते. मोठ्या व्यक्तीची चूक दिसून येते.पण आपण कलियुगात आहे. चूका आपल्याकडून होणारच आहे, चूक माणसाकडूनच होत असते. जेव्हा आपण चुकणार तेव्हाच चांगलं शिकणार,आयुष्य आपलं असते. आणि ते जगतांनी कितीदा आपण वाईट मार्गाने जातो. पण ती आपली परीक्षा असते. जितकी आपल्यात जिद्द चिकाटी राहते. तितके जास्त प्रश्न आपल्या परिक्षेसाठी तयार असते. जेव्हा कठीण प्रसंग आपल्यावर येतो. मदतीचा हात मागून सुद्धा मिळत नाही, तेव्हा आपल्या जागृकतेसाठी तो प्रसंग घडतो. एखाद्या वेळेस आपल्या नजरेसमोर वाईट प्रसंग घडतो, तेव्हा आपल्या मनात एक वेगळच वादळ सुरू राहते. डोळ्यांनी बघू शकतो. पण मदतीचा हात कसा द्यावा याचा विचार मनात येतो. अशा वेळेस जे जिद्द मनात राहते. 

काही हो आपल्याला हे कार्य करायचं आहे तोच आपल्यासाठी ईश्वराने दाखवलेला मार्ग असतो. फक्त आपण त्या मार्गावर जाणार की नाही हे आपल्यालाच माहीत असते. आणि सतत आपल्या प्रत्येक विचाराचं परिक्षण करणे, हे सुद्धा आपल्यावरच अवलंबून आहे.

जीवनात येतात अनेक प्रसंग
स्वतःवर ठेवा विश्वास कायम
दुसऱ्यांच्या सुखातच आनंदी
राहून ठेवा धीर आणि संयम..!

अनेकदा असं होते, आपली चूक आपल्या लक्षात येऊन सुद्धा आपण ते ग्राह्य धरत नाही. आणि तेथूनच आपल्यात आणखी चुक करण्याची गती वाढत जाते, जेव्हा एखादा व्यक्ती वाईट बोलतो तेच एक वाईट बोलणं त्या व्यक्तीला दहा वेळा वाईट बोलण्यास भाग पाडते. म्हणून न वाईट बोलता न चुकता आपली चुक स्वत:च लक्षात आणून निरिक्षण केलं तर कदाचित आपण पुन्हा चुकी करणार नाही. आणि इतरांमधील दिसलेली चुक लगेच आपल्या लक्षात येईल. वेळ ही अशी गोष्ट आहे कधी कोणावर कशी येईल सांगता येत नाही. आज दुसऱ्यावर आहे उद्या कदाचित आपल्यावर सुद्धा येऊ शकते. वेळेचे भान ठेवणे हे आपले कर्तव्य आहे कारण वेळ निघून गेली तर, आपल्यालाच पश्चाताप यायला नको. कारण वेळ आज जे आहे, उद्या ते असणारचं अस नाही. प्रत्येकवेळी मनात विचार येते ते सारखेच नसतात. तसच वेळेचं आहे, प्रत्येक वेळ सारखी नसते. कशाची काळजी न करता आपल्या कडून होईल तितके चांगले कार्य करीत राहा. होईल तितकी मेहनत, कष्ट करून आपलं स्वप्न पूर्ण करा. नक्की विचार आणि निर्णय जर पक्का असला तर, आपलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांच पण चांगले व्हावे हिच भावना ठेवा, आपलं सुद्धा चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही.

मनात असावी अशीच भावना
आनंद मिळावा नेहमी सर्वांना
कष्ट व मेहनत करून जीवनात
सुखी बनवा आपल्याच जीवना..!


✒️ दिपाली मारोटकर, अमरावती 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा