Breaking

आर्थिक कमाईसाठी सुरू केली चारा शेतीसांगली : सांगली जिल्ह्यातील शेतकरी नव्या मार्गानं आर्थिक कमाई वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सांगली जिल्ह्यातील बलवडी गावातील शेतकऱ्यांनी चारा शेतीतून कमाईचा नवा मार्ग शोधला आहे. नॅशनल कमिशन फॉर फार्मर्सचं देखील शेतकऱ्यांनी नवनवे प्रयोग करावे, असं मत आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात नॅशनल कमिशन फॉर फार्मर्सकडून चारा शेतीच्या मॉडेलवर काम करत आहेत. शेतकऱ्यांना मक्याच्या शेतीतून फायदा देखील मिळत आहेत. 


चारा बँक तयार करण्याचा प्रयत्न सांगलीच्या बलवडीमध्ये चारा बँक तयार करण्यासाठी 10 एकरावर मका शेती करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी आता 25 एकरांवर मका शेती करण्याचा प्रयत्न करणार आहेत. येथील शेतकरी गेल्या 5 वर्षांपासून चारा शेती करत आहेत. पाच वर्षामध्ये या प्रयोगामध्ये त्यांना फायदा झाला आहे. बलवडी परिसरातील शेतकरी ऊस शेतीपेक्षा चारा शेती फायदेशीर आणि कमी खर्चिक असल्याचं म्हटलं आहे. ऊसाच्या तुलनेत मका शेतीसाठी पाणी, कीटकनाशक, यूरिया कमी प्रमाणात लागतो. सागंली दूध उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. इंथे वर्षभर चांगल्या चाऱ्याची मागणी असते.


दुष्काळामध्ये चारा छावण्यांकडून मागणी


बलवडी परिसरातील शेतकऱ्यांनी 2019 मध्ये चारा शेती करण्यासाठी सुरुवात केली. त्यांनी चारा बँक तयार केली आहे. दुष्काळ पडतो तेव्हा परिसरात छावण्या टाकल्या जातात. राज्य सरकारच्या सहाय्यानं जनावरांच्या छावण्या उभारल्या जातात. चारा छावण्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून चालवल्या जातात. या छावण्यांकडूनही चारा पुरवण्याची मागणी होतं असते. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पुढाकारानं छावण्या टाकल्या जातात.


शेतकऱ्यांच्या सरकारकडून कोणत्या अपेक्षा


सांगलीच्या बलवडी आणि परीसरातील चारा उत्पादक शेतकऱ्यांची सरकारनं चारा खरेदीबाबत किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याची मागणी केली आहे. यामुळे दुष्काळाच्या काळात जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा चारा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते. सातत्यानं ऊस शेती केल्यानं जमिनीचा पोत बिघडत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा