Breakingभारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना विविध मागण्यांचे निवेदन


सुरगाणा
 (दौलत चौधरी) : भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन राऊत यांनी विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब यांना दिले.


या निवेदनामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचे एकत्रीकरण व सक्षम महामंडळ करणे, एक समान वेतन व वाढती महागाई बाबत, भविष्य निर्वाह निधी कार्यालयामध्ये जमा करणे, अपघात व मृत्यू विम्याचा लाभ मिळणे, गणवेशामध्ये बदल करणे, घरकुल योजनेचा लाभ मिळणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

लवकरच वरील मागण्यांसंदर्भात सबंधित मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन दिले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा