Breaking
रत्नागिरी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थी व शिक्षकांना उन्हाळी सुट्टी मिळावी : सुशीलकुमार पावरा


जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनरत्नागिरी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थी व शिक्षकांना उन्हाळी सुट्टी मिळावी, अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिस्ञा व मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी  सगळ्यां विद्यार्थी व शिक्षकांना उन्हाळ्याची सुट्टी हवी हवीशी  असते.मात्र कोरोना महामारीमुळे यावर्षी शाळा व काॅलेजांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार किंवा नाही? यात साशंकता आहे. यंदा उन्हाळ्याची सुट्टी न देण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत व शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये यंदाच्या उन्हाळी सुट्टीबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. कोरोना महामारीमुळे  शालेय वेळापत्रक व सुट्ट्यांच्या नियोजनात शासनस्तरावर सारखा बदल होत आहे. वर्षभर लाॅकडाऊन व पुन्हा मध्येच इयत्ता 5 वी पासून वरील सर्व वर्गाच्या शाळा व काॅलेज सुरू झाले.लाॅकडाऊन कालावधीत अनेक शिक्षक ऑनलाईन शिक्षण देण्याच्या कामात वर्षभर व्यस्त होते. 

प्रत्यक्षात शाळेत व देवळात शाळा भरवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम सुरूच ठेवले होते. विद्यार्थ्यांनीही ऑनलाईन शिक्षणात व प्रत्यक्षात शाळेत व काॅलेज मध्ये येऊन शिक्षण घेण्यात सहभागी झाले. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक हे वर्षभर ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून शिक्षणात व्यस्त होतेच. म्हणून विद्यार्थी व शिक्षक यांना दरवर्षी मिळणारी उन्हाळ्याची म्हणजेच आनंदाची सुट्टी हिरावून घेतली जाऊ नये.कारण अनेक विद्यार्थ्यांना आपल्या नातेवाईकांना भेटायचं असते.मामाच्या गावी जायचे असते .आपल्या आजी आजोबांना भेटायचे असते.आजी आजोबांच्या छान छान गोष्टी ऐकायच्या इच्छा असतात.तसेच आपल्या जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील अनेक शिक्षक कर्मचारी आहेत  व विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. दरवर्षी प्रमाणे त्यांनाही आपल्या घरच्यांना व नातेवाईकांना भेटायचे असते व खेड्यातला आपल्या सगळ्यांचे गावाकडचा आनंद घ्यायचा असतो. 

नैसर्गिक वातावरणाचा आनंद घ्यायचा असतो. एकमेकांच्या भेटीगाटी होणे,आजीच्या गोष्टी ऐकणे,आजी आजोबांचे सान्निध्यात काही दिवस घालवणे, उन्हाळ्यातील मावशी, मामीच्या हातचे वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ खाणे, वनराईतील आंब्यांचा स्वाद घेणे इत्यादींचे विद्यार्थी पूर्वनियोजन करून असतात.

वर्षभर ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण, हातातील मोबाईल, वाॅटसप, फेसबुक,घरातील टिव्ही व वर्षभर घरात कोंडून राहणे या सगळ्यातून बाहेर पडत मोकळा श्वास, आनंद घेण्याची विद्यार्थी व शिक्षकांना इच्छा आहे. म्हणून वरील सर्व बाबींचा विचार करून दरवर्षी शाळा व काॅलेज यांना मिळणारी 40 ते 45 दिवस दिवसांची उन्हाळ्याची सुट्टी कायम ठेवावी व विद्यार्थी व शिक्षक यांना या वर्षीही उन्हाळी सुट्टी मिळावी. अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कडे केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा