Breaking
सुरगाणा : अमास सेवा ग्रुपच्या माध्यमातून देशमुख कुटूंबाला मिळाला आधार


सुरगाणा (दौलत चौधरी) : तालुक्यातील पळसन येथे  (ता. ५ एप्रिल) रोजी लागलेल्या भीषण आगीत दिनेश गुलाब देशमुख या कुटूंबाचा संसार सगळा उघड्यावर पडला होता. या कुटूंबाला मदत करण्याचे आव्हान डॉ.दिनेश चौधरी व मित्रपरिवार पळसन यांनी व्हाटसअप/फेसबुकवर केले होते. 


या मदतीच्या बातमीचा व्हाट्सअप स्टेटस दिनेश देशमुखचा वर्गमित्र धनंजय नामदेव भोये (सराड) यांनी स्टेट्स ठेवल्यावर या स्टेटसची तात्काळ दखल घेत मित्राला मदतीचे केलेले आव्हान हे बघून अमास सेवा ग्रुप मुंबईचे प्रमुख चंद्रकांत देढिया यांनी अमास सेवा ग्रुपचे अध्यक्ष विजय भगत यांच्याशी संपर्क साधून त्यांनी देशमुख कुटुंबाला आधार देण्यासाठी पुढे आले.


लायनेस क्लब ऑफ जुहूचे अध्यक्ष छायाबेन पारेख, सचिव पुष्पबेन अग्रवाल तसेच ट्रस्टी स्मिता पारेख यांच्या सर्व्हिस फंडातून दिनेश देशमुख परिवाराला धनंजय भोये व डॉ. दिनेश चौधरी यांच्याशी संपर्क साधून देशमुख कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचे आज संध्याकाळी वाटप करण्यात आले.


त्यामध्ये गॅस, कपाट, संसारउपयोगी भांडे, २ पलंग, ४ जणांचे कपडे, किराणा साहित्य अशी भरीव मदत दिनेश देशमुख यांच्या कुटुंबाला करण्यात आली. त्यावेळी गावचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी अमास सेवा ग्रुप मुंबई यांच व लायनेस क्लब ऑफ जुहू रोड मुंबई यांचं आभार त्यांनी व्यक्त केले. दिनेश देशमुख यांनी देखील अमास सेवा ग्रुप व लायनेस क्लब जुहू रोड मुंबई यांचे पण आभार मानले. 


यावेळी मदत पोहचवतांनी गावातील सुभाष चौधरी, डॉ.दिनेश चौधरी, धनंजय भोये, प्रदीप चौधरी, रमेश चौधरी, अरुण महाले, कृष्णा भोये, चंदर पवार (पाटील), मिराबाई महाले, राधाबाई चौधरी, प्रतिभा देशमुख उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा