Breaking

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राज्यसरकारने आभार - कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे


पिंपरी चिंचवड : महानगरपालिकेच्या वतीने रिक्षाचालक, टपरी पथारी हातगाडी धारक, धुणीभांडी काम करणाऱ्या घरकामगार महिलांसह कष्टकरी जनतेला प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. रिक्षाचालक फेरीवाले घरकामगार महिला यांची दखल घेतल्याबद्दल कष्टकरी जनतेच्या वतीने कष्टकरी कामगार पंचायत आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी आभार व्यक्त केले आहेत.


बाबा कांबळे म्हणाले, श्रमिक कामगार कष्ट करणाऱ्या जनतेचा हा सन्मान असून गेल्या वीस वर्षांपासून या घटकांसाठी लढा देत आहे. आज या घटकांची दखल घेतली याबद्दल समाधान वाटत असून कष्टकऱ्यांना रिक्षाचालकांना सन्मान मिळावा या आपल्या मागणीला यश येत आहे, याबद्दल आनंद होत आहे. 


पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकारी अधिकारी आणि शहरातील आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचे कष्टकरी जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो, असे मत कांबळे यांनी व्यक्त केले.


कोव्हीड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने पंधरा दिवसाचा लॉक डाऊन जाहीर केला असून संचारबंदी केली आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कष्टकऱ्यांची उपजीविका आणि त्यांचे व्यवसाय बंद आहेत. यामुळे त्यांच्यावर उपासमार ची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने त्यांना मदत करावी अशा प्रकारची मागणी वेळोवेळी कष्टकरी कामगार पंचायत व महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने करण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा