Breaking
"सह्याद्रीतील आदिवासी कोळी महादेव लगीन संस्कृती" या पुस्तकाचे होणार लवकरच प्रकाशन


सांदण आदिवासी लोकचळवळीचे प्रथम प्रकाशन


संगमनेर : "सह्याद्रीतील आदिवासी कोळी महादेव लगीन संस्कृती" या पुस्तकाचे प्रकाशन सांदण आदिवासी लोकचळवळीच्या वतीने करण्यात आले.

सांदण आदिवासी लोकचळवळ आदिवासी समाज प्रबोधनासाठी व वैचारिक जागृती साठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम हाती घेत असते. आपल्या प्रत्यक्ष कृतीतून चळवळीने संपूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी समाज प्रबोधनाचे कार्य अविरतपणे केले आहे.

आदिवासी समाज हा मूळनिवासी समाज म्हणून मान्यता मिळाली असतानाही, या निसर्गपूजक संस्कृती असलेल्या समाजाचा मात्र कोणताही इतिहास किंवा संदर्भसाहित्य अभ्यासासाठी आवश्यक तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. निसर्ग हीच संस्कृती, निसर्ग हाच धर्म व निसर्ग नियमानुसारच चालीरिती व परंपरा हीच आदिवासींची ओळख आहे. मात्र बदलत्या काळाच्या ओघात आदिवासी जमातींची ही ओळखही लुप्त होत चालली आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची चालीरीतींची ओळख टिकून राहावी, यासाठी काही संदर्भ रहावेत, यातूनच धनंजय दिनकर पिचड यांना संकल्पना सुचली व ती प्रत्यक्ष संतोष दगडू मुठे यांनी कागदावर उतरवली. यातूनच "सह्याद्रीतील आदिवासी कोळी महादेव लगीन संस्कृती" या पुस्तकाची निर्मिती झाली.

सह्याद्रीतील निवासी कोळी महादेव जमातीचे लग्न संस्कृतीची ओळख होण्यासाठी इगतपुरी, सिन्नर, अकोले, जुन्नर, खेड या बहु निवासी कोळी महादेव जमातीतील प्रत्यक्ष लग्न समारंभास उपस्थित राहून, तेथील वडिलधार्‍यांची चर्चा करून, या पुस्तकाचे लेखन करण्यात आले. हे पुस्तक सर्व आदिवासी बांधवांना पर्यंत पोहोचावे यासाठी प्रकाशक म्हणून सांदण आदिवासी लोकचळवळ संगमनेर यांनी महत्त्वाचे योगदान दिले. 

सांदण आदिवासी लोक चळवळीचे अध्यक्ष अरविंद सगभोर यांनी यावेळी सदर पुस्तकाचे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लवकरच ऑनलाइन प्रकाशन करणार असल्याचे सांगितले. पुस्तक लवकर प्रकाशित व्हावे म्हणून चळवळीचे सचिव किरण बांडे, सुनील भवारी, प्रकाश मधे, गणेश शेंगाळ, भाऊराव धोंगडे, दशरथ गभाले, तुकाराम कोरडे, भाऊसाहेब वेडे, रवी पिचड, बाळासाहेब डगळे, बाळू इदे, संतोष भांगरे, संजय ठोकळ, गणपत गंभीरे, यांनी अनमोल प्रयत्न केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा