Breaking
महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्य धरणे आंदोलनाला महिना पूर्ण, मात्र प्रशासन बेफिकीर


किसान सभेच्या नेतृत्वाखाली आंदोलन


सांगली : रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 बाधीत फेर सर्वे व नव्याने बाधीत शेतकर्‍यांच्या निवाडा नोटीस तातडीने द्या, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे 4 मार्च पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. 

आज (4 एप्रिल) शनिवारी 1 महिना पूर्ण झाला. त्याच बरोबर सुरू असलेल्या साखळी उपोषण चा आजचा 12 वा दिवस आहे.

प्रशासनाकडून काही शेतकऱ्यांना निवाडा नोटीसा

प्रशासनाने काही निवाडा नोटीस जरी दिल्या असल्या तरी अजून अनेक शेतकऱ्यांना निवाडा नोटीस मिळणे बाकी आहे. बाधीत क्षेत्रात असलेली तफावत, फेर सर्वे झालेल्या बाधित बांधकामाच्या निवाडा नोटीस, शिरढोण येथील नव्याने बाधीत शेतकर्‍यांच्या बाधीत क्षेत्राच्या व बांधकामाच्या निवाडा नोटीस जो पर्यंत मिळणार नाहीत तो पर्यंत आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय बाधीत शेतकर्‍यांनी घेतला असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी दिगंबर कांबळे यांनी सांगितले.

प्रशासनाचा काळ्या फिती लावून निषेध 

महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला. परंतु तरीही प्रशासन दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध केला. यावेळी महामार्ग बाधित शेतकर्‍यांना न्याय द्या, शेतकरी एकजुटीचा विजय असो, किसान सभा जिंदाबाद, बाधीत शेतकर्‍यांच्या निवाडा नोटीस मिळाल्याच पाहिजेत, शेतकर्‍यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड दिगंबर कांबळे, रजनीकांत पाटील, बाळासाहेब पाटील, सागर पाटील, अमित पाटील प्रदीप पाटील, सुनील करगने, सेवक पाटील, गोरख सुर्यवंशी, मच्छिंद्र पाटील, आनंदराव पाटील, रावसाहेब पाटील, लक्ष्मण चौगुले व इतर बाधीत शेतकरी उपस्थित होते.

आ. सुमनताई पाटील यांची शिष्टाई असफल

महामार्ग बाधित शेतकरी आंदोलनाला आमदार सुमनाताई पाटील यांनी भेट देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. परंतु जोपर्यंत न्याय दिला जात नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु महिना उलटून गेला, तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देताना दिसत नाहीत.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा