Breaking

जपान मध्ये कोरोनाचा कहर ; ऑलिम्पिक रद्द


टोकियो : जगभरात कोरोनाची दुसरी लाट अतिशय धोकादायक ठरतेय. जपानमध्ये वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहून पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी भारत दौरा रद्द केला आहे. या महिनाअखेरचा नियोजित भारत व फिलीपाइन्सचाही दौरा रद्द करण्याचा निर्णय सुगा यांनी घेतला. जपानमध्ये वाढणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर सुगा यांनी लक्ष केंद्रित केले आहे. टोकियो, आेसाका व ह्योगो प्रांतातील परिस्थिती बिघडत चालली आहे. जपानमध्ये अतिशय मंद गतीने लसीकरण सुरू आहे.


संसर्ग वाढीमागे हे महत्त्वाचे कारण मानले जाते. ब्लूमबर्ग लस ट्रॅकरनुसार जपानमध्ये केवळ २० लाख ५४ हजार ८८० लोकांना डोस देण्यात आला. देशाची लोकसंख्या मात्र १२ कोटी ६१ लाखांवर आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केवळ 1 टक्के लोकांना डोस देण्यात आला. दोन्ही टप्प्यांत मिळून ०.६ टक्के डोस देण्यात आले. 


संसर्गामुळे २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांच्या आयोजनावर संकट आहे. विविध प्रांतांच्या राज्यपालांनी आणीबाणी लागू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे दबाव वाढला आहे. टोकियोत २९ एप्रिलपासून ९ मेपर्यंत आणीबाणी लागू शकते. येथे आतापर्यंत १३ लाखांहून जास्त बाधित व १८५० मृत्यू झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा