Breaking

वारली आदिवासींंचा लढा आज चळवळींंसाठी ऊर्जा देणारा - डॉ. अशोक ढवळे


पुणे : वारली आदिवासींंचा लढा आजही चळवळींसाठी ऊर्जा देणारा आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी केले.


ते पुणे जिल्हा किसान सभेच्या वतीने आयोजित व्याख्यानात "वारली आदिवासींंचा लढा व आजची आव्हाने" या विषयावर बोलत होते.

पुढे बोलताना डॉ. ढवळे म्हणाले, वारली आदिवासींंनी जमिनदारी, शोषणाविरोधात लढा देत स्वाभिमान जागा गेला. त्यांना स्वतः च्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यात कॉम्रेड शामराव परुळेकर व कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांचे योगदान अतुलनीय आहेत. इतिहास त्यांची दखल घेत आहे आणि यापुढे ही घेईल.

देशात कोरोनाची महामारीने आव्हान उभे केले आहे. तसेच देशातील खाजगीकरण, उदारीकरणाने प्रचंड वेग घेतला आहे. गेल्या तीन महिन्या पेक्षा जास्त दिवसांपासून देशभरात शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन सुरु आहे. परंतु देशातील मोदी सरकार भांडवलदारी धोरण रेटताना दिसत आहेत. आता आपल्यासमोर शेतकरी आंदोलनाला पाठबळ देणे, कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज होणे, आणि खाजगीकरणाविरोधातील लढा तीव्र करणे ही आव्हाने आहेत, असेही डॉ. ढवळे म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा