Breaking

मोठी बातमी : वारुळवाडी, नारायणगाव येथे रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने विक्री करणारे तिघे ताब्यातजुन्नर (पुणे) : दौड व वारुळवाडी, नारायणगाव येथे रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने विक्री करणारे तिघे ताब्यात घेतले. पुणे ग्रामीण एलसीबी पथकाने ही कामगिरी केेेली आहे.


पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पुणे जिल्हयात कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळ्या बाजाराने शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असल्याची माहिती काढून कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची प्रत्येक विभागात पथके नेमण्यात आलेली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दौड व वारुळवाडी नारायणगाव ता.जुन्नर अशा दोन ठिकाणी रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने विकी करणारे तिघा आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून एकूण ६ रेमिडीसिव्हर इंजेक्शन व इतर मुद्देमाल असा एकूण किंमत रुपये १ लाख १९ हजार ७६९ रुपयेचा माल जप्त केलेला आहे. 


दौंड गावचे हदीत हुतात्मा चौक, गणपती मंदिरासमोर ता.दौंड जि.पुणे येथे इसम अक्षय राजेश सोनवणे (वय २४ वर्षे) रा.गांधी चौक, विठ्ठल मंदिराचे मागे, दौंड ता.दौंड जि.पुणे व सुरज संजय साबळे (वय २३ वर्षे) रा. शालिमार चौक, स्वामी समर्थ मंदिराचे मागे, दौंड ता.दौड जि.पुणे हे दोघेजण रेमिडीसिव्हर इंजेक्शन प्रत्येकी ३२,००० रुपयाला एक असे विक्री करत असताना सापडले. त्यांचे ताब्यातून ३ रेमिडीसिव्हर इंजेक्शन  ७ हजार ८७९ रुपये, दोन मोबाईल २० हजार रुपये,  व होंडा अॅक्टीव्हा दुचाकी ७० हजार रुपये असे एकूण ९७ हजार ८७९ रुपये चा माल जप्त करण्यात आला. 


नारायणगाव जवळील मौजे वारुळवाडी ता.जुन्नर राजाराम सबनिस विदयालयासमोर ता.जुन्नर जि.पुणे येथे इसम रोहन शेखर गणेशकर (वय २९ वर्षे) रा.वाणेवाडी पो.आपटाळे ता.जुन्नर जि.पुणे येथे ३ रेमिडीसिव्हर इंजेक्शन प्रत्येकी ४५ हजार रुपयाला विक्री करीत असताना सापडला. त्याचे  ताब्यातून ३ रेमिडीसिव्हर इंजेक्शन ११ हजार ८९० रुपये व मोबाईल १० हजार रुपये सह एकूण २१ हजार ८९० रुपयेचा माल जप्त करण्यात आला.


कोविड -१९ या साथीच्या आजाराचे औषध म्हणून वापरण्यात येणारे रेमिडीसिव्हर इंजेक्शन बेकायदेशीररित्या, अवैध व गैर मार्गाने मिळवून ते काळया बाजाराने स्वतःचे अर्थिक फायदयासाठी कोणताही परवाना नसताना विक्री करणेसाठी जवळ बाळगून औषध विक्रेते नसतानाही खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादकाने ठरविलेल्या एम . आर.पी. पेक्षा जास्त चढया बाजाराने विक्री करताना व विकत घेताना मिळून आलेने दोघे आरोपीवर दौंड पोलीस स्टेशनला व एका आरोपीवर नारायणगाव पोलीस स्टेशनला औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ सह वाचन कलम ३ (२) (सी), जीवनाश्यक वस्तु अधिनियम १९९५ चे कलम ७ (१) (ए) (ii) , औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० चे कलम १८ (सी), २७ (बी) (ii), २८, २२ (१) (cca), २२ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक, विवेक पाटील, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहा. फौ. शब्बीर पठाण, पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, पोलीस निरीक्षक गुरु गायकवाड, मुकेश कदम, दत्ता तांबे, सागर चंद्रशेखर, काशिनाथ राजापुरे, दगडू विरकर यांनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा