Breaking
पळसन येथे आदिवासी महिलेचे घर आगीत भस्मसात


सुरगाणा (दौलत चौधरी) : तालुक्यातील पळसन येथील मोहनाबाई गुलाब देशमुख या महिलेचे घर दुपारी अडीच ते चार वाजेच्या सुमारास आगीत जळून खाक झाल्याने अख्खे कुटूंबच रस्त्यावर आले आहे. आग विझविण्याकरीता पूर्ण  गावच पाण्याचे हंडे, बादल्या, पिंप भरून मदतीला धावून आले मात्र घराच्या भिंती कुडाच्या व छप्पर कौलारू असल्याने ग्रामस्यांना आगीवर नियंत्रण  मिळवता आले नाही. वाऱ्याचा झोत कमी असल्याने  अनर्थ टळला अन्यथा संपुर्ण गावच आगीच्या  भक्षस्थानी पडला असता.


या रहात्या घरात दोन लहान मुले, मुलगा, सुन असा परिवार रहात होता. काही कामानिमिताने बाहेर गावी गेल्याने मोठा अनर्थ टळला. पाच एप्रिल रोजी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास या अचानक लागलेल्या आगीत सुमारे आठ ते नऊ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये किंमती सागवान चिरलेले इमारत बांधकामचे लाकुड, दोन कपाट, एक रेफ्रिजेटर, दुरदर्शन संच, घर बांधणी करीता ठेवलेले एक लाख वीस हजार रुपये, धान्य भात, नागली आदी आगीत भस्मसात झाले आहे. त्याच प्रमाणे दिनेश देशमुख या मानसेवी शिक्षकाचे कागदपत्रे आगीत भस्मसात झाली आहेत. 


सहायक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे, प्रभाकर सहारे यांनी घटनास्थळी भेट दिली असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा