Breaking
खरा कम्युनिस्ट : कॉम्रेड भाऊ सुर्यवंशी काळाच्या पडद्याआड


इचलकरंजी (कोल्हापूर) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, तसेेच वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मार्गदर्शक कॉम्रेड भाऊ सुर्यवंशी यांचे ८२ व्या वर्षी चंदूूर येथे दु:खद निधन झाले. 


आयुष्यभर सायकलवरून पेपर वाटत आल्यामुळे असेल, पण सायकल जणू त्यांची सहचरीच बनलेली. पक्षाच्या नावेच श्वासोच्छवास चालू असल्याने कामगार काय, शेतकरी काय, महिला काय किंवा विद्यार्थी-युवक काय, आख्खं जग कम्युनिस्ट बनवायचा त्यांना ध्यास लागलेला. स्वतःचा संसार फाटका असला तरी इतरांच्या जीवनाची घडी शिवत बसायचा नाद. यंत्रमाग कामगारांना संघटित करणाऱ्या चळवळीला इतर जनआंदोलनाची जोड देण्याची सततची ऊर्मी. या ऊर्मीतूनच चंदूर गावी त्यांनी कम्युनिस्ट पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. कामगार संघटनेपासून डीवायएफआय, जनवादी, किसान सभा आणि एसएफआय ची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला. 

पक्षाची खालावत चाललेली परिस्थिती पाहून ते अतिशय व्यथित होत. भांडवली, सरंजामी प्रवृत्तींचा पक्षजीवनात शिरकाव होत आहे काय या आशंकेनं मन काळवंडून जाई, पण त्याची लक्षणं कधी चेहऱ्यावर दिसू दिली नाहीत. निराश न होता काम चालू ठेवण्यावर त्यांची अविचल श्रद्धा होती. ८२ वर्षांचे भाऊ कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते होते. 

पक्षाची खालावत चाललेली परिस्थिती पाहून ते अतिशय व्यथित होत. भांडवली, सरंजामी प्रवृत्तींचा पक्षजीवनात शिरकाव होत आहे काय या आशंकेनं मन काळवंडून जाई, पण त्याची लक्षणं कधी चेहऱ्यावर दिसू दिली नाहीत. निराश न होता काम चालू ठेवण्यावर त्यांची अविचल श्रद्धा होती. ८२ वर्षांचे भाऊ कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते होते. 

"चंदूर गावी राहत असलेल्या भाऊंचा शारीरिक आणि त्याहून अधिक मानसिक वावर सर्वदूर जाणारा होता अखेरच्या श्वासापर्यंत खरा कम्युनिस्ट कसा जगतो, हे त्यांच्याकडे पाहून समजे. आयुष्याची बरीच वर्षे वर्तमानपत्रे विकून आपला उदरनिर्वाह चालवलेला. पण विचार मात्र पक्षाचा. दिवसरात्र. वारकऱ्याच्या तोंडी विठ्ठलाचं नसेल इतकं त्यांच्या मुखी पक्षाचं नाव असे. त्यांच्या लेखी पक्ष म्हणजे फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष. माऊली म्हणजे विठूमाऊली, तसा पक्ष म्हणजे माकप होते, अशी भावना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. उदय नारकर यांनी व्यक्त केली."

एस. पी. पाटील, शांताराम गरूड, के एल. मलाबादे यांच्या खांद्याला खांदा लावून आणि नंतरही इचलकरंजीच्या धनसत्तेशी उभी हयात दोन हात करण्याची स्पृहणीय कामगिरी करूनही मोठेपणाचा, गर्वाचा लवलेशही नसलेला मनुष्य. पार्किन्सन झालेला असतानाही पक्षाच्या ऑफिसात येऊन बसायची धडपड तरूणांनाही लाजवत असे. 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य कॉम्रेड अशोक ढवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कोल्हापूर जिल्हा सेक्रेटरी प्राचार्य ए. बी. पाटील, तसेच विविध स्तरातून भाऊंच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले जात आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा