Breakingपरीक्षा न घेता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही पास करा, राज ठाकरेंची मागणी

                     

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारला महत्वपूर्ण सुचना केल्या आहेतपहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा न घेता पास करा, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली.


राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव यांच्याशी चर्चा केली. यावेळी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा. ते कोणत्या मानसिकतेत आहेत, माहिती नाहीत. ही पोरं तर लहान आहेत, कुठून अभ्यास करणार, कशा परीक्षा देणार, माहिती नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.


तसेच शाळा बंद आहेत, पण शाळांच्या फी तशाच आहेत त्यामुळे शाळांची फी निम्मी करा अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा