Breaking'या' बाळासाठी जमा झाले 16 कोटी, करणार आजारावर मात !


पिंपरी : आठ महिन्यांच्या चिमुकल्या वेदिकाला एक दुर्मिळ आजार झाला. त्या आजारावर उपचार म्हणजे 16 कोटी रुपयांची एक लस. त्यावर आयात शुल्क… एवढी रक्‍कम कुठून आणणार असा प्रश्‍न पालकांसमोर उपस्थित होता. पालकांनी नागरिकांना आवाहन केले आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला. वेदिका अकरा महिन्यांच्या होण्यापूर्वीच नागरिकांच्या सहाय्याने तब्बल 16 कोटी रुपये जमा झाले.


महाराष्ट्र जनभूमीने आपल्या वेबपोर्टलच्या माध्यमातून महिनाभर जनतेला मदत आवहान करणारे पोस्ट वेबसाईटवर जाहिर केले होते. जनतेच्या मदतीने अखेर वेदिकाला लस मिळणार आहे.

केंद्र सरकारने देखील आयात शुल्क माफ केले. आता प्रतीक्षा आहे ती अमेरिकेहून लस येण्याची. लस आल्यानंतर वेदिकावर उपचार केले जाणार आहेत. यामुळे हजारो नागरिकांची मदत आणि शुभेच्छांच्या बळावर अकरा महिन्यांची चिमुकली वेदिका त्या भीषण आजारावर मात करणार आहे.

कु. वेदिका शिंदे ही भोसरी येथील रहिवासी सौरभ शिंदे व स्नेहा शिंदे यांची एकुलती एक मुलगी. वेदिकाला एसएमए प्रकार - 1 हा दुर्मिळ आजार झाला आहे. हा आजार खूप जलदगतीने बाळाच्या नसा आणि स्नायूंना कुमकुवत करतो व जसजसे हे प्रमाण वाढत जाते तसतसे रुग्णाला श्‍वास घेणे, चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होते व वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो.

वेदिका आता 11 महिन्यांची आहे आणि तिला या समस्या आठव्या महिन्यापासूनच सुरू झाल्या होत्या. त्यानंतर वेदिकावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. सध्या आवश्‍यकतेनुसार या रुग्णालयात वेदिकाला फॉलोअपसाठी न्यावे लागत आहे.

शक्‍य तेवढ्या लवकर लस दिली तर वेदिका पूर्णपणे ठणठणीत बरी होऊ शकते, असे डॉक्‍टरांनी निदान केले आहे. लसीचे त्याकरिता झोलगेन्स्मा (नेश्रसशपीार) लस अमेरिकेमधून आयात करावी लागणार असून, एक डोसची किंमत 16 कोटी रुपये आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा