Breaking
घरेलू कामगारांच्या मागण्या सोडवा; अन्यथा अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलनाचा सीटूचा इशारा


नांदेड : घरेलू कामगारांच्या मागण्या सोडवा; अन्यथा अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा सेंटर ऑफ ट्रेंड युनियन (सीटू) ने दिला आहे.


नांदेड जिल्ह्यातील घरकाम करणाऱ्या घरेलू कामगारांचे अर्थसहाय्य, पेंशन व इतर प्रश्न सोडवावेत व संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी व युनियन प्रतिनिधींची तातडीने ऑनलाइन किंवा फिजीकल बैठक बोलावून सरसकट कामगारांना न्याय द्यावा अन्यथा दि.१७ मे रोजी अशोक चव्हाण कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री नांदेड जिल्हा यांच्या निवासस्थाना समोर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत शारीरिक आंतर राखून आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र सीटू जिल्हाध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार, जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, सीटू संलग्न घरेलू कामगार संघटनेच्या निमंत्रक कॉ. करवंदा गायकवाड, कॉ. मारोती केंद्रे व इतर कामगारांनी लेखी स्वरूपात दिला आहे.


राज्य शासनाने दि.१३ एप्रिल २०२१ रोजी कडक निर्बंध जाहीर करीत कोविड - १९ च्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी शासनाने घरेलू कामगारांना दिड हजार रूपये आर्थिक मदत जाहीर केली असून ती फारच तुटपुंजी असून किमान दरमहा पाच हजार रूपये पुढील सहा महिन्या पर्यंत देण्यात यावेत तसेच वयाची अट ५९ वर्षे आहे ती रद्द करून सरसकट सर्व कामगारांना लाभ देण्यात यावा. आधार कार्ड, रेशन कार्ड व घरमालकाचे हमी पत्र या आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणाऱ्यांचे अर्ज स्वीकारून तातडीने आवश्यक ते मनुष्य बळ कामगार कार्यालयात उपलब्ध करून किमान सहा डाटा ऑपरेटर नेमणूक करून, सहा कॉऊंटर कामगार कार्यालयात सुरू करावेत व बेरोजगार घरेलू कामगारांना तात्काळ अर्थसाहय्य मिळण्याच्या दृष्टीने विचार करावा. कामगार संघटनांनी मागणी केल्यास युनिट निहाय जायमोक्यावर जाऊन सरकारी कामगार अधिकारी यांनी नोंदणी, नुतणीकरण व अद्यावत करण्याचे काम करावे.


तसेच आशा व गट प्रवर्तकाांना जीव धोक्यात घालून कोविड काळात काम करावे लागत असल्यामुळे सर्वांना शासकीय सेवेत समावून घ्यावे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना ५० लाख विम्याचे कवच लागू करण्यात यावे. स्वारातीम नांदेड विद्यापीठातील कंत्राटी कामगारांनी तक्रार केल्याने त्यांना कामावरून कमी केले आहे. त्या सर्व कामगारांना तात्काळ कामावर घेऊन वादग्रस्त कंत्राट कंपनी सीआयएसबी आणि गोदावरी एंटरप्रायजेस यांंना काळ्या यादीत टाकून नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण करावी किंवा सीटू युनियनकडे जबाबदारी देण्यात यावी. रेल्वे मजदूर युनियनच्या महिला सदस्यांनी केलेल्या अँट्रोसिटी प्रकरणातील मुख्य आरोपी आर.मंगाचार्यलू व एस.के.वल्ली यांची नावे पुर्ववत एफआयआर प्रमाणे दोषारोप पत्रात समाविष्ट करावेत व तत्कालीन उप विभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर यांचेवर कायदेशीर कारवाई करावी. अँट्रोसिटी गुन्ह्यातील पिडिता अनुराधा परसोडे यांना समाज कल्याण विभागाने तात्काळ आर्थिक मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा