Breaking
अहमदनगर जिल्ह्यातील "या" आमदार यांना कोरोनाची लागण, उपमुख्यमंत्री आणि जयंत पाटील काळजी घेण्याचा दिला सल्ला


अहमदनगरजिल्ह्यातील आमदार डॉ. किरण लहामटे यांनां कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून सातत्याने ते जनतेच्या सेवेत असताना त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉसिटीव्ह आली आहे.  


आ. लहामटे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फोनद्वारे विचारपुस करून स्वतः ची व कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे सांगतिले आहे.

तसेच राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांनीही आ. लहामटे यांची विचारपूस केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा