Breaking

अकोले : मासेमारीमुळे अंबित जलाशय प्रदूषित, संबंधितांवर कारवाई करा - सुशिलकुमार चिखले


अकोले : मासेमारीमुळे अंबित जलाशय प्रदूषित झाले असून जलसंपदा विभाग याकडे जाणूनबुजून कानाडोळा करत असल्याचा आरोप युवा नेते राजा हरिश्चंद्रबहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांनी केला आहे.


चिखले म्हणाले की, मुळा पाणलोट क्षेत्रातील अंबित जलाशयात खासगी व्यक्तींनी मासेमारी सुरू केली आहे. माशांना टाकण्यात येणाऱ्या खाद्यामुळे पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. दूषित पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, संबंधितांवर प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील गावांनी दिला आहे.

आंबित जलाशयातून तीन वर्षांसाठी मासेमारीचा ठेका आंबित ग्रामपंचायतीने दिला आहे. हा ठेकेदार जलाशयातील माशांना खाद्य टाकत असून, त्यामुळे पाण्यावर काळा तवंग आला आहे. सध्या जलाशयातून पाणी सोडण्यात आले आहे. या दूषित पाण्याचा सात गावांना पुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलसंपदा विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संतोष बोटे यांनी ही माहिती घेत, तात्काळ युवा नेते सुशिलकुमार चिखले यांच्या कानावर घातली. त्यांच्याकडे अनिता धिंदळे, मारुती लोहकरे, दामू सखाराम धादवड, अंजनाबाई धादवड, मच्छिंद्र धादवड, भारती धादवड यांनी पाणी दूषित झाले आहे, पाण्याची तपासणी करुन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा