Breakingआकुर्डी : श्रमिकांना न्याय देण्यात केंद्र सरकार अपयशी, विशेष आर्थिक पॅकेज देण्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी


आकुर्डी : 26 मे 2021 रोजी मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण होऊनही श्रमिक, उपेक्षित वर्गाच्या हालअपेष्टा संपलेल्या नाहीत। शेतकरी कामगार विरोधी कायद्यामुळे देशातील बहुसंख्य वर्ग दारिद्र्य रेषेखाली लोटला गेला आहे. 2020 पासूनच्या कोरोना महामारी मध्ये केंद्र सरकारची संपूर्ण आरोग्य सेवा कोसळली. लाखो गरीब लोक ऑक्सिजन, जीवरक्षक औषधे इंजेक्शन अभावी मृत्यूमुखी पडले, अशी टिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर सचिव  गणेश दराडे यांनी केली. 


ते सरकारच्या जनविरोधी नीतीचा देशव्यापी निषेध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दत्ता पाडाळे पुतळा, आकुर्डी येथे निदर्शने करतेवेळी बोलत होते.

यावेळी कोरोना महामारी आर्थिक दुरावस्थेत इन्कमटॅक्स न भरणाऱ्या कुटुंबाना दरमहा 7500 रुपये अनुदान  द्या, या प्रमुख मागणीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावेळी सतीश नायर, अपर्णा दराडे, सचिन देसाई, विनोद चव्हाण, देविदास जाधव, विनोद चव्हाण, अविनाश लाटकर, अमिन शेख, अमोल जगताप उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा