Breakingराजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरानवी दिल्ली : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची ३० वी पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून सोमवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.


कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त श्याम लाल गोयल यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. गोयल यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ’ दिली. याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा