Breakingआदिवासी महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधामास अटक करा, बिरसा क्रांती दलाची मागणीऔरंगाबाद : आदिवासी भिल्ल समाजाच्या महिलेवर जबरदस्तीचा प्रयत्न करत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या आरोपींवर अॅस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष केशव पवार यांनी पोलीस निरीक्षक पैठण जिल्हा औरंगाबाद यांच्याकडे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात लोहगाव येथील पैशाच्या माजावर एका व्यक्तीने भिल्ल समाजाच्या महिलेवर खुप दिवसांपासुन वाईट नजर ठेऊन होता व महिलेने विरोध केला असता तिला व तिच्या पतीला‌ कित्येकदा बाहेरचे गुंड आणून घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली होती.


आदिवासी समाजाच्या लोकांवर दिवसेंदिवस अन्याय व अत्याचार होत असल्याच्या घटना वाढत आहेत. म्हणूनच अशा निंदनीय गैरप्रकार करणाऱ्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. तरी निवडूंगे तालुका पाथर्डी येथील आदिवासी  भिल्ल महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी केशव पवार केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा