Breaking
आशा व गटप्रवर्तक संघटनेने बिनीचे शिलेदार गमवले - राजेंद्र साठे


नागपूर : आशा व गटप्रवर्तक फेडरेशनने बिनीचे शिलेदार गमवले अशी भावना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी व्यक्त केली.


१ मे रोजी आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे राज्य महासचिव कॉम्रेड सलीम पटेल यांच्या मृत्यू झाला. तसेच आज (दि.१०) राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड रंजना नरूला यांच्या सुद्धा कोरोना ने मृत्यू झाला. 

कॉम्रेड रंजना नरुला यांनी आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रश्नांना घेऊन मोदी सरकार यांचेकडे साकडे घालण्याच्या मानस बनवला होता. त्यांच्याच निर्णयानुसार २४ व २५ एप्रिल रोजी दिल्ली येथे केंद्रीय समितीची बैठक होती. परंतु दिल्ली येथे लॉकडाऊन असल्यामुळे व कॉम्रेड नरुला पॉझिटिव्ह आल्यामुळे मीटिंग होऊ शकली नाही. कॉम्रेड नरूला या देशपातळीवर सीआयटीयू महिला आघाडीच्या कामकाजी महिलांच्या बाबतीत धडाडीच्या नेत्या होत्या. 

साठे म्हणाले, सर्वात मोठी दुःखाची बाब आजच्या कोरोणा संकटामध्ये आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना कमीत कमी मोबदल्या मध्ये मोठा कामाचा बोजा देण्यात आलेला आहे. यामधून बाहेर पडणे कठीण झाले. एकीकडे कामाच्या बोजा दुसरीकडे अल्प मानधन अशी आमच्यामध्ये दुफळी माजली आहे. त्याकरता आमच्या सर्वाकरता लढणारे आम्हीच नेते ही तयारी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी करणे गरजेचे आहे. त्याशिवाय आम्ही ही लढाई जिंकू शकत नाही. आणि सरकारच्या घशातून आमचे हक्क मिळवून घेऊ शकत नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीच्या परिचय देऊन संघटित रूपाने संघटनेच्या पाठीशी राहण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा