Breakingकेरळमध्ये भाजपचे खाते बंद ; पिनराई विजयन यांनी करून दाखवलंतिरुअनंतपुरम : केरळ विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात डाव्या लोकशाही आघाडीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. केरळात पहिल्यांदाच सत्तांतराचा इतिहास बाजूला ठेवत एलडीएफकडे दुसऱ्यांदा राज्याची सत्ता सोपवली आहे. मात्र भाजपने मागच्या वेळी उघडलेले खाते त्यांना यावेळी उघडता आले नाही.


केरळ विधानसभेत एलडीएफने (LDF) १४० जागांपैकी तब्बल ९९ जागांवर विजय मिळवत केरळमध्ये पुन्हा लाल झेंडा फडकवला आहे. दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचेही अनेक दावे फोल ठरले आहेत. मुख्यमंत्री पदावर दावा करणाऱ्या काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त लोकशाही आघाडीला (UDF) ४१ जागांवर समाधान मानावे लागले आहे.


यात विशेष म्हणजे मागील निवडणुकीत खाते उघडणाऱ्या भाजपला यावेळी खातेच उघडता आले नाही. या निकालानंतर पिनराई विजयन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यात पिनारई मागील पंचवार्षिकला भाजपने केरळमध्ये आपलं खातं उघडल्याचं सांगत आहेत.

 


 तसेच यंदा आम्ही भाजपचं केरळमधील खातं बंद करु असाही विश्वास व्यक्त केला होता. निकालानंतर पिनराई यांनी आपला शब्द खरा करुन दाखवल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.


भाजपने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. केरळमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा दावेदारच काय साधा एक आमदारही जिंकून आणता आलेला नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी निवडणुकीत म्हटल्याप्रमाणे भाजपचं केरळ विधानसभेतील खातं बंद केल्याचं बोललं जातंय.


दरम्यान, भाजपने या निवडणुकीत केरळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरवलं होतं. केरळमधील प्रसिद्ध चेहरा असलेल्या मेट्रो मॅन ई श्रीधरन यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.


अधिक वाचा


केरळ मध्ये पुन्हा डावे ; पिनराई विजयन यांनी घडवला इतिहास


तमिळनाडूमध्ये स्टेलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमकेचा दणदणीत विजय ; या पक्षाला मिळाल्या इतक्या जागा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा