Breaking
भारतीय जनता पार्टी व ओबीसी सेल तर्फे पोलिस बांधवांना कोव्हिड योध्दा सन्मान पत्र तसेच मास्क व सॅनिटायझरचे वाटपसुरगाणा (दौलत चौधरी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात दिनांक ३० मे २०२१ रोजी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, ओबीसी प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ, दिंडोरी लोकसभा खासदार डॉ. भारती पवार ज्येष्ठ नेते हरीचंद्र चव्हाण, माजी खासदार दिंडोरी लोकसभा मतदारसंघ रमेश थोरात, एन डी गावीत, सुनील भोये यांच्या मार्गदर्शना खाली सेवा ही संघटन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा शहर पोलीस स्टेशन येथे मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. अखिल मानव जातीवर कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आले आहे. या आणीबाणीच्या स्थितीतही पोलीस जीवाचे रान करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत आहे. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी दिवसरात्र राबून पोलिसच करतात. या संसर्गाचा धोका ओळखूनही प्रत्येकजण राबत आहे. त्यामुळे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोव्हिड योध्दा म्हणुन सन्मान पत्र प्रदान‌ दिले, तसेच गावोगाव जाऊन १००% लसीकरण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.


यावेळी कार्यक्रमास जिल्हा ओबीसी सेल सरचिटणीस विजय कानडे, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष नितेश सूर्यवंशी, व्यापारी आघाडी छोटू शेठ, बालू सुरवंशी, दिनकर पिंगळे, श्रावण मोरे, संतोष वाघ, मयुर वाघ, रवी वाघ, मनोज कानडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा