Breaking
मोठी बातमी : आयपीएलचे सर्व सामने अनिश्चित काळासाठी स्थगितनवी दिल्ली : देशभरात दिवसेंदिवस कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आयपीएलमधील काही खेळाडू पॉझिटिव्ह असून यामुळे नियोजित सामने रद्द करावे लागत होते याच पार्श्वभूमीवर आता संपूर्ण स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.


सध्या सुरु असलेली आयपीएल २०२१ ची (IPL) स्पर्धा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. आयपीएलमधील उर्वरित सामने कधी घेण्यात येतील याबाबत मात्र आयपीएलकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.


दरम्यान, याआधी भारताचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी आयपीएल स्थगित करण्याची मागणी केली होती. तसेच ॲड. करण सिंग ठुकराल आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन सिंह यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी ५ मे रोजी सुनावणी होणार आहे, मात्र, त्याआधीचं बीसीसीआयने सर्व सामने रद्द केल्याचे जाहीर केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा