Breaking
मोठी बातमी : तोक्ते पाठोपाठ दुसरे चक्रीवादळ धडकणार ! पुर्व किनारपट्टीला इशारा


नवी दिल्ली : तोक्ते चक्रीवादळाचे थैमान थांबत नाही तोच भारतीय हवामान खात्याने आणखी एका मोठ्या चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. हे वादळ येत्या २३ मे ला पुर्वेकडील बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान देखील वाढले आहे. तोक्ते चक्रीवादळ थांबत नाही तोच चार - पाच दिवसाच्या फरकाने आणखी एक वादळ घोंघावत आहे.

ओमानने या चक्रीवादळाचे नाव "यास" असे ठेवले आहे. हे वादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशा च्या दिशेने येत आहे. लवकर याबाबत निश्चित स्वरूप दिले. हवामान खात्याने तुर्तास पूर्व किनाऱ्यापट्टीला सतर्कतेचा इशारा दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा