Breaking
माणूसकीने कोरोना रूग्णांवर उपचार करणा-या डाॅक्टरला बिरसा क्रांती दलाचा पाठिंबा


नाशिक : माणूसकीने कोरोना रूग्णांवर उपचार करणा-या डाॅ. अतुल वडगांवकर हार्ट स्पेशालिस्ट नाशिक यांच्या कार्याला जाहीर पाठिंबा देत असल्याचे निवेदन सुशिलकुमार पावरा युवा राज्याध्यक्ष बिरसा क्रांती दल महाराष्ट्र यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे व पालकमंत्री नाशिक यांना पाठविले आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण भरती होवू लागले होते . मात्र डॉ. अतुल वडगांवकर हार्ट स्पेशालिस्ट गंगापूर रोड नाशिक  यांनी रुग्णालयात दाखल न होता घरी उपचाराने देखील कोरोनावर मात करता येवू शकते असा दावा करताना रुग्णांवर त्यापध्दतीने उपचार केले. त्यांच्या उपचाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या दुस-या लाटेतही अगदी कमी दरात रुग्णांवर उपचार होवून ते बरे होवू लागल्याने अद्यापही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. परंतू डॉ. वडगांवकरांना त्यांच्याच व्यवसायातील काही व्यापारी मानसिकतेच्या सहकाऱ्यांकडून धमकावण्याचा प्रकार घडला नाशिक येथे घडला आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. 

कोरोना रूग्ण वाढत असलेल्या रूग्णालयांना व डाॅक्टरांना कारणे दाखवा नोटीस देणे इत्यादी प्रशासकीय  कार्यवाही करणे योग्य आहे, परंतु कोरोना रूग्ण कमी करणा-या डाॅक्टरांवर कार्यवाही करणे हे उचित वाटत नाही. कोरोना महामारीच्या काळात शर्थीने प्रयत्न करणा-या डाॅ.वडगांवकर यांच्या चांगल्या  कार्याला बिरसा क्रांती दल संघटना पाठीशी आहे. डाॅ.वडगांवकर यांना धमकावणा-यांवर कडक कारवाई करावी व  डाॅ.वडगांवकर यांना त्यांचा व्यवसाय त्यांच्या योग्य  पद्धतीने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी. अशी मागणी सुशिलकुमार पावरा युवा राज्याध्यक्ष बिरसा क्रांती दल महाराष्ट्र यांनी शासनाकडे केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा