Breakingबिरसा क्रांती दल सामाजिक क्रांती घडवेल : सुशिलकुमार पावरा


रत्नागिरी : बिरसा क्रांती दल ही आदिवासींची सामाजिक संघटना असून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, आत्म सन्मानासाठी, अस्तित्व, अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त, शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी अशा एकूणच आदिवासींच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी संघटना यवतमाळ येथे स्थापन करण्यात आली. भगवान बिरसा मुंडा यांना आदर्श ठेवून 15 नोव्हेंबर 2015 रोजी बिरसा मुंडा जयंतीच्या दिवशी संघटनेची सुरवात झाली आहे.


अनुसूचित जमाती जात प्रवर्गातून नियुक्ती, पदोन्नती मधील ख-या आदिवासी उमेदवारांवर होत असलेला अन्याय, आरक्षण, आदिवासींच्या संविधानिक अधिकाराची गळचेपी, अन्याय आणि अत्याचाराविरोधात पाठपुरावा आणि प्रसंगी न्यायीक लढा देण्याचे उद्देश बिरसा क्रांती दल संघटनेचा आहे. 

दशरथ मडावी हे बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष असून युवा वर्गाच्या कामाने संघटन देशभर झपाट्याने वाढत आहे. अल्पावधीतच संघटन देशभर पसरले आहे. फारच कमी कालावधीत बिरसा क्रांती दल संघटनेने लक्षवेधी कामे करून आदिवासी जनतेला प्रभावित केले आहे. कोकण, नाशिक, पुणे  मराठवाडा, विदर्भ इत्यादी विभागातील बिरसा क्रांती दलाचे कार्यकर्ते नेत्रदिपक कामगिरी बजावत आहेत.
 
बिरसा क्रांती दल संघटनेचा उद्देश लोकांना पटत असल्यामुळे व संघटनेची कामे आवडत असल्यामुळे मोठ्या पासून लहानापर्यत सर्वच आदिवासी बांधव संघटनेत जुळत आहेत. युवा वर्गाचे काम नेत्रदिपक असून कर्मचारी वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात संघटनेत शामिल होत आहेत. डाॅक्टर, वकील, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी याचबरोबर काही  लोकप्रतिनिधी सुद्धा आवडीने संघटनेचे सभासद होत आहेत. इतर आदिवासी संघटनांनासुद्धा सोबत घेऊन सामाजिक कामे बिरसा क्रांती दल करत आहे.  त्यामुळे बिरसा क्रांती दल संघटन हे एक मातृसंघटन म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

बिरसा क्रांती दल संघटनेतला प्रत्येक सभासद अभिवादन करताना जय बिरसा ! जय आदिवासी! बोलू लागला आहे. हिंदू व इतर धर्माच्या देवीदेवतांचे पूजन करणे सोडून निसर्गदेवतेची पूजा करू लागला आहे. स्वत: ला आदिवासी म्हणायला अभिमान बाळगू लागला आहे. आदिवासी स्वतंत्र धर्मकाॅलमची मागणी करू लागला आहे. संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या दरवर्षीच्या राजा रावण पूजनाच्या प्रथेने आणखीन आदिवासींच्या समाजपरिवर्तनात भर पाडली आहे, अशी माहिती बिरसा क्रांती दलाचे युवा राज्याध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा