Breaking
शिनोली येथे परिचारिका दिन साजरा


शिणोली  : कोविड केअर सेंटर शिणोली येथे परिचारिका दिन साजरा करण्यात आला.आद्यपरिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस हा त्यांच्या समानार्थ  जगभरामध्ये जागतिक परिचारिका दिन  म्हणून साजरा केला जातो.


कोविड केअर सेंटर शिणोली येथील कर्मचाऱ्यांनी मिळून परिचारिका  दिवस साजरा केला,या कार्यक्रमामध्ये डॉ.अंकुश डिगरे सर यांनी मार्गदर्शन करताना हा दिवस साजरा करण्यापाठीमागील इतिहास सांगितला.आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या, कोवीड योद्धा म्हणून अमूल्य योगदान देत प्राणपणाने आणि वीरतेने लढत रुग्णांच्या सेवेत अहोरात्र अविरत झटून कर्तव्य बजावणाऱ्या समस्त परिचारिकांच्या कार्याची माहिती त्यांनी  याप्रसंगी सांगितली. यावेळी महेश गाडेकर यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करत परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी डॉ.अंकुश डिंगरे सर व कोविड केअर सेंटर शिणोली येथील कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे आभार मंगेश गाडेकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा