Breaking
राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता ! 'या' जिल्ह्यांना इशारा


पुणे
 : राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा डोके वर काढले आहे. बदलत्या वातावरणामुळे अनेक राज्यात तीव्र उन्हाळा जाणवतोय तर काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात तयार झालेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम रात्रीच्या वेळेस जाणवू लागला. राज्यात रात्रीच्या वेळी उकाड्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

मागील काही आठवड्यात राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्यानंतर हळूहळू तापमानाचा पार वाढत होता. मात्र तेवढ्यात वातावरणात पुन्हा बदल होत येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. 


राज्यात येत्या ४ ते ५ दिवसात काही भागांमध्ये विजांच्या गडगडासह पावसाची शक्यता आहे. तर आज पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, हिंगोली, बीड, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत येत्या 3 - 4 तासांत वादळी वाऱ्यासह, मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा