Breakingपुढील दोन तीन दिवसांत "या" भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यतापुणे : नुकत्याच येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळाने  पश्चिम किनारपट्टीला चांगलेच झोडपले असताना आता पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद आणि जालना या ठिकाणी  ता. २४ व २५ हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. 


तसेच दोन-तीन दिवसात मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.


दरम्यान, लवकरच मान्सूनचे देखील आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा