Breaking
पिंपरी चिंचवड : खंडित विजपुरवठ्यामुळे नागरिक नोकरदार हैराण, नगरसेविका अश्विनी जाधव यांचा आंदोलनाचा इशारा


पिंपरी चिंचवड खंडित विजपुरवठ्यामुळे नागरिक नोकरदार हैराण झाले आहेत. या विरोधात नगरसेविका अश्विनी जाधव आक्रमक झाल्या असून चिखली महावितरणचे अभियंता रमेश सुळ यांनी निवेदन देत वीज पुरवठा नियमित करावा अशी मागणी केली आहे. अन्यथा आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


नगरसेविका जाधव म्हणाल्या, चिखली प्रभाग क्र.2 जाधववाडी, कुदळवाडी, राजे शिवाजीनगर या परिसरात संपूर्ण लॉकडाऊन काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वाय फाय, इंटरनेट बंद होऊन प्रभागातील वर्क फ्रॉम होम करणाऱ्या सेवा क्षेत्रातील नोकरदार वर्गाचे काम विस्कळीत होते आहे. कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे.

कडक उन्हाळ्यात वीज खंडित होत असल्यामुळे सोसायट्यांना वेळेत पाणी लिफ्ट करता येत नाही. खंडित विजपुरवठ्यामुळे घरातील पंखे, वातानुकुलित यंत्रणा बँड होऊन नागरिकांना उन्हाळ्याचा अधिक त्रास होत आहे. प्रभागातील लघुउद्योग आणि पीठ गिरण्या बंद पडतात, असेही जाधव म्हणाल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा