Breaking


जुन्नर तालुक्यातील कोविड केअर सेंटरसाठी पुणे जिल्हा परिषदेकडून १२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पणबेनके कुटुंबियांकडून तालुक्यातील सर्व सेंटरना प्रत्येकी १ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोविड केअर सेंटरसाठी पुणे जिल्हा परिषदेकडून १२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.


जुन्नर तालुक्यातील सर्व शासकीय कोविड सेंटरसाठी आ. बेनके व बेनके कुटुंबियांच्या वतीने प्रत्येकी १ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मदत म्हणून देत असल्याची माहिती बेनके यांनी दिली.


जुन्नर तालुक्यातील कोरोना प्रादुर्भावामध्ये चढ उतार पहायला मिळत आहे. वाढते कोरोनाचा प्रादुर्भाव प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहेत.


या लोकार्पण प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, युवा नेते अमोल लांडे, पं.स.सदस्य दिलीप गांजळे, तहसिलदार हनुमंत कोळेकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा