Breaking
जुन्नर : आदिवासी संदर्भात अपशब्द लिहून फेसबुक पेजवर आदिवासींच्या भावना दुखावणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी


जुन्नर आदिवासी संदर्भात अपशब्द लिहून फेसबुक पेजवरील ग्रुपवर पाठवून आदिवासींच्या भावना दुखावणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी लोकप्रतिनिधींंनी पोलीस निरीक्षक जुन्नर एका निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मडके यांनी शिवनेरीवरी सापडलेल्या दगडी तोफ गोळ्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित करून वन परिक्षेत्र अधिकारी, जुन्नर यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. याबाबत रमेश खरमाळे यांनी "निसर्गरम्य जुन्नर तालुका" या फेसबुक पेज वरील “सह्याद्रीचे सौंदर्य' या ग्रुपवर भावनिक पोष्ट टाकल्याने त्यांच्या अनेक फोल्लोवेर्स यांनी "सह्याद्रीचे सौंदर्य” ग्रुपवर अनेक पोष्ट शेअर केल्या आहेत. त्यातीलच “जुन्नर तालुक्यातील मिलिंद मडके या या नालायक पत्रकाराचा जाहीर निषेध" अशा आशयाची पोष्ट करण्यात आली होतो. वरील पोष्टच्या अनुषंगाने अनेक प्रकारच्या कॉमेंट करण्यात आला होत्या.

दिपक नवले नामक व्यक्तीने खालील कॉमेंट केली आहे, "चौकशीला कोण घाबरत. ज्यांनी देशाची सेवा केली, त्या सैनिकावर खोटे आरोप करताना लाज नाही वाटत का. हिम्मत असेल तर चौकशी लावा. जो चांगल काम करतो होते त्याला पाठींबा देण्यापेक्षा, असले फालतू आरोप करताना थोडी लाज बाळगावी. फालतू आदिवासी बिगर आदिवासी क्षेत्र असल घाणेरड राजकारण बंद करा. आम्ही रमेश खरमाळे बरोबर आहोत."

तसेच निवेदनात म्हटले आहे की, फालतू आदिवासी हा शब्द वापरून आदिवासींच्या अस्मितेला,  सन्मालाला दीपक नवले या व्यक्तीने धक्का लावला आहे. तसेच आदिवासी समाज्याच्या भावना दुखून दोन समाज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दीपक नवले या व्यक्तीवर सायबर क्राईम अंतर्गत तसेच आदिवासी कायद्या अंतर्गत अॅट्रॉसिटी कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी हिरडा कारखान्याचे चेअरमन काळू शेळकंदे, पंचायत समिती सदस्य काळू गागरे, आदिवासी नेते मारुती वायळ, मिलिंद मडके, शरद हिले, दत्तात्रय गवारी, किसन केदारी, जालिंदर साबळे, गेणू बांडे, किसन अंभिरे हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा